अलिबाग तालुक्यात गुरुवारी 103 नवे रुग्ण

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अलिबाग तालक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असून गुरुवारी 17 जून रोजी अलिबाग तालुक्यात तब्बल 103 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 57 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 152 झाली आहे. यापैकी 431 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 526 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 194 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version