| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मधील मुख्य लेखी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी मिळणार आहे. (दि.16) जुलैपासून फेरपरीक्षा होणार असून त्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. मंडळाच्या वेबसाईटवर (दि.3) जूनपासून उपलब्ध होणार आहे. दहावीची परीक्षा (दि.16) ते (दि.30) जुलै, तर बारावी सर्वसाधारण व द्विलक्षी विषय व ऑनलाईन परीक्षा (दि.16) जुलै ते (दि.8) ऑगस्ट आणि बारावी व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा (दि.16) जुलै ते (दि.3) ऑगस्टदरम्यान होणार आहे. दोन्ही परीक्षांचे अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी शाळांमधून छापील स्वरूपात मिळणार आहे. सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.