दहावी, बारावीचे पुरवणी पेपर पुढे; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने दहावी व बारावीची शुक्रवारी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी, तर बारावीचा पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या (25 जुलै) होणार्‍या दहावी आणि बारावी बोर्डच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी होणारा दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा पेपर 31 जुलै रोजी होणार आहे. तर बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा उद्याचा पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता. मात्र, आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. परीक्षेच्या अन्य वेळापत्रकाध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Exit mobile version