। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या एम.बी.पाटील शाळेमध्ये दहावी विद्यार्थी शुभेच्छा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमास पराग फुकणे, रविंद्र आयनोडकर, रविंद्र आयोनडकर, देशपांडे सर, मछिंद्र पाटील, अतुल पाटील, देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्वरा नांदगावकर, आचल भायदे, प्राप्ती मोरे, प्रिंन्स सिंग, प्रणव चौधरी, शर्वरी पाटील आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर येथील शिक्षक रुकसाना सय्यद, दिप्ती माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थी वर्गाला संबोधित केले.