। रायपूर । वृत्तसंस्था ।
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डीआरजीच्या जवानांवर हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहानांवर स्फोट घडवून आणला.
एका ठिकाणी नक्षलवाद्यी येणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. तसेच, त्यामध्ये नक्षल्यांचे कमांडरही असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आलं होतं. त्याचवेळी नक्षलींनी जवानांच्या वाहनांवर निशाणा साधला. नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजीच्या जवानांसह एका ड्रायव्हरचा समावेश आहे.
नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हे अत्यंत दुःखद आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नक्षलवाद्यांना सोडलं जाणार नाही. अजिबात दया दाखवली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.