11 वर्षीय सायकल पटूची सायकलवरून जनजागृती

| नेरळ | प्रतिनिधी |

11 वर्षीय शाळकरी विद्यार्थी आपल्या पॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या हिरेन राम हिसालके या सायकलपटूने जागतिक हवामान बदल दिनानिमित्त जनजागृती दिनानिमित्त सायकलवरून फेरी मारून केली. नेरळमधील बाजारपेठ, गृह निर्माण संस्था आणि सगुणाबाग येथे स्थानिकांनी हिरेनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

15 ऑगस्ट 2023 आणि 2 जानेवारी 2024 मध्ये कुठेही न थांबता 35 ते 45 किलोमीटर अंतर सायकल चालवून हुतात्मा आणि क्रांतिकारक यांना अभिवादन केले. नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेत शिकत असलेल्या हिरेन याने जागतिक हवामान बदल दिनाचे निमित्ताने रविवारी सायकलवरून जनजागृती मोहीम यशस्वी केली. त्यासाठी सायकलवर प्रदूषण रोखण्याचे आवाहन करणारे फलक तसेच, झाडे लावा झाडे जगवा यासह झाडांची तोड होत असल्याने आणि सतत वणवे लावले जात असल्याने ग्लोबल वोमिन्गचा निर्माण झालेला धोका याची माहिती देणारे साहित्य यासाठी हिरेन हिसालके याने आपल्या सायकलवर बांधून सर्वांचे लक्ष वेधले. त्यात सर्वात महत्वाचे जनजागृतीचे कार्य हिरेनने आपल्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर ठेवला होता आणि त्या सिलेंडरमधून नाकावाटे प्राणवायू घेण्याचा प्रयत्न भविष्यात करावा लागेल असे संकल्पना घेऊन सकाळपासून नेरळ गावात जनजागृती केली.

सायकलवरून निघालेल्या हिरेनचे सर्वत्र कौतुक होत होते आणि विद्यार्थी तसेच, ग्रामस्थ यांच्यासमोर सायकल थांबवून हिरेन सर्व माहिती देत होता. नेरळमधील अनेक गृहनिर्माण संस्था यांनी हिरेनला संपर्क साधून आपल्या सोसायटीमध्ये येऊन जनजागृती करण्याचे निरोप दिले होते. तर नेरळ बाजारपेठमध्ये देखील हिरेन च्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर रविवार असल्याने सगुणाबाग येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते आणि तेथे बोलावून घेतले. सगुणाबाग येथे पर्यटकांनी हिरेनसोबत फोटो काढून त्यांच्या संकल्पनेबद्दल जाणून घेतले. या उपक्रमाची सुरुवात नेरळ पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक सरगर यांनी झेंडा दाखवल्यावर हिरेनचा सायकल प्रवास सुरु झाला आणि जनजागृती सुरु झाली.

Exit mobile version