जिल्ह्यात 110 कोरोना रूग्ण


109 कोरोना मुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रविवारी रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये 110 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

रविवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 32, पनवेल ग्रामीण 15, उरण 6, खालापूर 9, कर्जत 9, पेण 13, अलिबाग 8, मुरुड 1, माणगाव 8, तळा 1, रोहा 5, सुधागड 1, श्रीवर्धन 1, पोलादपूर असे 110 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 50, पनवेल ग्रामीण 21, उरण 12, खालापूर 4, माणगाव 8, , सुधागड 8, श्रीवर्धन 3 म्हसळा 3अशा एकूण 109 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 437 झाली आहे. यापैकी 2 लाख 15 हजार 951 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 704 झाला आहे. सद्यस्थितीत 782 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version