जिल्ह्यात 112 कोरोना रूग्ण

129 कोरोना मुक्त एक मृत्यू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शनिवारी रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये 112 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 781 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 129 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शनिवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 30, पनवेल ग्रामीण 19, उरण 6, खालापूर 11, कर्जत 3, पेण 9, अलिबाग 20, मुरुड 2, तळा 1, रोहा 4, सुधागड 4, म्हसळा 1, महाड 2 असे 112 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 71, पनवेल ग्रामीण 18, खालापूर 10, कर्जत 8, माणगाव 19, रोहा 1, श्रीवर्धन 2 अशा एकूण 129 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 327 झाली आहे. यापैकी 2 लाख 15 हजार 842 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 704 झाला आहे. सद्यस्थितीत 781 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version