म्हसळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या 12 घटना

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत 1238 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानाच्या 35.93 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात 1 जुलै पासून धुँवाधार पाऊस पडत आहे. 13 दिवसात 755 मि.मि. पावसाची नोंद झाली. गुरुवारा दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान सोसाट्याच्या वार्‍याने नागरीकाना निर्सग वादळाच्या आठवणीना उजाळा देऊन भितीचे वातावरण नागरिकांत झाले होते. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा आतापर्यंत 12 घटनांची नोंद झाल्याचे निवासी नायब तहसीलदार जी.एम.तेलंगे यानी सांगितले. तालुक्यातील पाभरे,संदेरी ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे.

आपत्ती काळात तालुक्यांतील झालेली नुकसान पुढील प्रमाणे:
पूर्णतः पडलेले कच्चे घर 1, महाड खाडी, अंशत: पडलेली पक्की घरे 4, संडास /बाथरुम नुकसान 2, मेंदडी, सुरई, वारळ, विहीर कोसळणे 1, घराभोवतालची भिंत कोसळणे 2 आंबेत, वारळ, पशुधन हानी मोठी जनावरे 1, आंबेत शॉक लागून, संदेरी पुरांत वाहून, या कालावधींत कोणत्याही झोपड्यांची, गोठ्यांची पडझड झाली नाही. जीवितहानी व जखमी व्यक्तीचा अहवाल (निरंक), सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान (निरंक).

24 तास सेवा
म्हसळा तालुक्यात आपत्ती नियंत्रण कक्ष तहसील कार्यालय येथे 24 तास सेवा सुरु आहे. काही आपत्ती झाल्यास 02149- 232224, मोबा. 8459795326,संपर्क साधावा असे अवाहन निवासी नायब तहसीलदार जी.एम तेलंगे यानी केले आहे.

Exit mobile version