। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात आतापर्यंत 285 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाळी हंगामाचे जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे 34 जणाचे सुमारे रु 10 लाख 60 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आसल्याची माहीती महसुल विभागाने दिली. अतीवृष्टी, वादळ वार्यामुळे घर व गोठे, कौलारू घरे, घरांचे पत्रे उडणे साठविलेले धान्य भिजणे असेही प्रकार होऊन तालुक्यातआर्थिक नुकसान झाल्याचे समजते. तालुक्यांत अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसून नागरिक आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.