3 जणांचा मृत्यू तर 161 झाले कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज रविवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी नव्याने 120 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 161 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत तर मुरुड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रविवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 39, पनवेल ग्रामीण 13, उरण 1, खालापूर 6, कर्जत 7, पेण 7, अलिबाग 18, माणगाव 9, तळा 1, रोहा 6, सुधागड 4, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 7 असे एकूण 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. पनवेल मनपा क्षेत्र, आणि अलिबाग या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 63 हजार 768 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 076 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 564 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.