जिल्ह्यात 125 रुग्ण; 8 जणांचा मृत्यू तर 123 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी नव्याने 125 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 123 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 77, पनवेल ग्रामीण 8, कर्जत 6, पेण 9, अलिबाग 17, माणगाव 1, तळा 1, रोहा 1, सुधागड 2, श्रीवर्धन 1, महाड 1, पोलादपूर 1 असे एकूण 125 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर उरण, खालापूर, मुरुड, म्हसळा या 4 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे पनवेल ग्रामीणमध्ये 4, रोह्यात 2 तर महाड, कर्जतमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 65 हजार 175 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 59 हजार 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 207 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 564 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version