अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 127 रुग्ण, 64 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात रविवारी 127 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान समोर आले आहे. तर 64 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने अनेक दिवसात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. रविवारी तालुक्यात आढळून आलेल्या 127 रुग्णांमध्य चेंढरे, अलिबाग शहर, कुरुळ, कुसूंबळे, सासवणे, झिराड, कुरुळ, गोंधळपाडा, आंबेपूर, मांडवा, आगरसुरे, वाघ्रण, किहीम, बांधण, धोकवडे, नवगाव, धोकवडे, चिखली, उसर, चौल, रेवदंडा, श्रीगाव, शहाबाज, आक्षी, वरसोली, वढाव, शहाबाज, पेझारी, मोठे शहापूर, भाल, वेश्‍वी, नवीन देहेन, आंबेगाव, पाल्हे, वाडगाव, धसाडे कुणे, थळ, ताडवागळे, वायशेत, आंबेघर, पोयनाड, कामार्ले, हेमनगर, आवास यागावातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 21 हजार 765 झाली आहे. 612 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 268 जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 885 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version