| मुंबई | प्रतिनिधी |
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातून 25 हजार रुपयांची लाच घेताना एका लिपिकाला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ शनिवारी सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून ते नॉटरिचेबल आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील त्यांच्या कार्यलयात एसीबीने छापा मारला होता. या छाप्यामध्ये संबंध आढळल्यास राजीनामा देईन असे त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता झिरवळांच्या खासगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे चौकशीत समोर आले आहे. या घटनेनंतर मंत्री झिरवाळ नॉट रिचेबल आहेत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत मंत्री झिरवाळ यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावर आता ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.






