बारावीचा पुन्हा पेपर फुटला: गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

। मुंबई । वार्ताहर ।
बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी १०.३० वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला…? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे…? यामागे रॅकेट सक्रिय आहे का…? याचा तपास केला जात आहे.

मात्र, इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार नुकताच निस्तरल्यावर आता गणिताच्या पेपरचा नवा गोंधळ होण्याची चिन्हं आहेत. याबाबत बोर्डाच्या सूत्रांकडून अद्याप पेपर फुटल्याचा दुजोरा मिळालेला नाही.

Exit mobile version