| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींचे मतदान आज होत असून रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदानाची गती संथ असल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत एकूण 13.26 टक्के मतदान झाले.
त्यात अलिबागमध्ये 14.70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर, महाडमध्ये 20.49 टक्के, पोलादपूरमध्ये 16.11 टक्के, उरण 14.94 टक्के, पनवेल 14.49 टक्के, पेणमध्ये 14.10 टक्के, श्रीवर्धन 13.71 टक्के, म्हसळा 13.32 टक्के, रोहा, माणगाव 12.99 टक्के, कर्जत 10.74 टक्के, तर खालापूरमध्ये 9.94 टक्के मतदान झाले आहे. दोन तासाच्या कालावधीत 50 हजार 471 मतदारांनी मतदान केले. त्यात 22 हजार 730 स्त्री व 27 हजार 471 पुरुष मतदारांचा समावेश आहे.