रायगड जिल्ह्यात 134 नवे कोरोना रुग्ण

11 जणांचा मृत्यू तर 248 झाले कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी नव्याने 134 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 248 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सोमवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 66, पनवेल ग्रामीण 14, उरण 6, खालापूर 1, कर्जत 4, पेण 2, अलिबाग 25, माणगाव 2, रोहा 4, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 8 असे एकूण 134 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड, तळा, सुधागड व पोलादपूर या चार तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच पनवेल ग्रामीण आणि उरण तालुक्यात प्रत्येकी तीन तर अलिबाग तालुक्यात दोन, पनवेल मनपा क्षेत्र, पेण, आणि श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 57, पनवेल ग्रामीण 26, उरण 25, खालापूर 7, कर्जत 7, पेण 29, अलिबाग 69, मुरुड 2, तळा 3, रोहा 9, सुधागड 3, श्रीवर्धन 3, म्हसळा 1, महाड 7 अशा एकूण 248 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 61 हजार 865 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 050 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 213 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version