| पनवेल | वार्ताहर |
राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत चौदा लाखांचा मद्य आणि वाहने जप्त केली आहेत.तुर्भे परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सुनिल शांतीभाई वाघेला, डॉ. झाकीर हुस्सेन ,उमेश जितेंद्र दुबे ,विधी संघर्ष गस्त बालक आदींनी अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण हरिश्चंद्र गणा पाटील, रा. तुर्भे याच्या मालकीच्या इको मधून ही विदेशी मद्याची वाहतूक अवैधरित्या वाहतूक करीत होते.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कोपरखैरणे, तुर्भेगाव आदी ठिकाणी छापा टाकून विदेशी बनावट मद्य जप्त केले. तसेच मद्याची वाहतूक करणारी वाहने असा एकूण चौदा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.






