31 मार्चला पुढील सुनावणी
| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत मधील रौंद परिसरातील गुरचरण जागा जैसे थे ठेवण्याचा आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिला आहे. येथील काही एकर जागा खाजगी विकासकाने विकत घेऊन तिथे आपले काम सुरू केले होते.याला विहूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता.सदरील जागा ही गुरुचरण असताना जागा ही खाजगी मालकाची कशी असा सवाल ग्रामस्थांनी केला होता. याबाबत उप विभागीय अधिकारी यांनी या जागेबाबतचा निकाल हा खाजगी विकासक यांच्या बाजूने दिला होता. या निर्णय विरोधात विहूर ग्रामस्थांनी कोकण आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. दोन्ही पक्षाचे बाजू ऐकल्यावर कोकण आयुक्त यांनी पुढील सुनावणी 31 मार्चपर्यंत ठेवण्यात आली असून तो पर्यंत सदरची जागा जैसे थे तशीच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वीहूर ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की कोकण आयुक्त यांचा स्थगिती आदेश प्रती सर्व महसूल वन व पोलीस यंत्रणेस देणार आहोत तो पर्यंत या ठिकाणी कोणतेही काम होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.