11 कोरोनामुक्त, 12 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिलासादायक म्हणजे उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 12 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 10, पनवेल ग्रामीण 3, कर्जत 1, अलिबाग 1 असे 15 रुग्ण आढळले. तसेच उरण, पेण, खालापूर, मुरुड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 12 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 207 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 440 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 577 वर गेला आहे. सद्यस्थितीत 190 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.







