। महाड । प्रतिनिधी ।
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दि. 31 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. अशातच रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यात एकाच शाळेतील 17 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिकणारे 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे.
या शाळेमधील एक विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अँटीजन चाचण्या करण्यात आल्या होत्या. याच चाचण्यांचे अहवाल समोर आले असून त्यामध्ये 17 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिलीय.
करोनाचा संसर्ग झालेल्या 17 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.