जिल्ह्यात 150 कोरोना रूग्ण; 209 कोरोना मुक्त एक मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बुधवारी रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये 150 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 887 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान पेण तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात 209 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. बुधवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 64, पनवेल ग्रामीण 20, उरण 2, खालापूर 9, कर्जत 9, पेण 8, अलिबाग 12, माणगाव 8, तळा 3, रोहा 2, सुधागड 5, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 5 तर पोलादपूर 1 असे 150 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 88, पनवेल ग्रामीण 29, उरण 10, खालापूर 4, कर्जत 17, पेण 27, अलिबाग 10, मुरुड 1, माणगाव 7, रोहा 3, श्रीवर्धन 3, महाड 9 आणि पोलादपूर 1 अशा एकूण 209 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 929 झाली आहे. यापैकी 2 लाख 15 हजार 339 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 703 झाला आहे. सद्यस्थितीत 887 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version