जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पनवेल मनपा सह, पनवेल ग्रामीण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या 9 तालुक्यामध्ये तब्बल 64 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 32, पनवेल ग्रामीण 10, खालापूर 2, कर्जत 1, पेण 9, अलिबाग 4 रोहा 2, श्रीवर्धन 1, म्हसळा1 आणि महाड 2 असे 64 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 18, पनवेल ग्रामीण 7, उरण 1, खालापूर 2, पेण 5, अलिबाग 4, माणगाव 1 तर महाड 1 अशा एकूण 39 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 817 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 851 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 इतका आहे. सद्यस्थितीत 268
सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.