। रसायनी । वार्ताहर ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर एलपीजी गॅस वाहून येणारा टँकरचा रोटो गेज वॉलव्हच्या नटमधून गॅस बाहेर येण्याचा प्रकार मंगळवारी घडला.मात्र,अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे धनंजय गीध यांनी वन मॅन आर्मी सारखी एक आपत्कालीन घटना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
टँकर देहू रोड येथून पास होत असताना ही बाब चालकाच्या लक्षात आली. त्याने लिकेज थांबवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना केली (एमसिल लावले). मात्र तो गेज गेज बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. भारत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून ही बाब आपल्या अभियानातील केमिकल एक्स्पर्ट धनंजय गीध यांच्या लक्षात आणून दिली गेली.
मोहोपाडा रसायनी येथील धनंजय गीध यांनी सदर टँकरला महामार्गावर गाठले खोपोली येथून फॉलो करुन निर्मनुष्य जागी रसायनी दांड फाट्याजवळ सुरक्षितपणे टँकरला बाजूला घेऊन तपासणी केली. सर्व सुरक्षेचे निकष लक्षात घेत त्या टँकरचा तो लिकेज असलेला नट बदलला. या उपायामुळे पुढील दुर्घटना टाळली.