शेकापचे १५०० कार्यकर्ते उपस्थित राहणार

तालुका चिटणीस राजेश सानप यांची माहिती
| रोहा | प्रतिनिधी |

2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापनदिन पेण तालुक्यातील वडखळ येथे साजरा होणार असून, या कार्यक्रमात रोहा तालुक्यातील 1500 कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शेकाप रोहा तालुका चिटणीस राजेश सानप यांनी दिली आहे.

पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या सूचनांचे पालन करत रोहा तालुक्यात तालुका चिटणीस राजेश सानप, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर, माजी जि.प. सदस्य नंदकुमार म्हात्रे, माजी पं.स. सभापती लक्ष्मण महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत भातसई, मेढा, आंबिवली, निडी तर्फे नागोठणे, संभे, घोसाळे, चणेरा, खारगाव, तळाघर, देवकान्हे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका वर्धापनदिन तयारीसाठी घेण्यात आल्या. या बैठकांना कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, दोन वर्षांनंतर होणार्‍या या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी विक्रमी गर्दी होईल, असा विश्‍वास सानप यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version