| रोहा | प्रतिनिधी |
2 ऑगस्ट रोजी सुधागड पाली येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला युवराज छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार असून, रोहा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
वर्धापनदिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील उपस्थित होते. तालुका चिटणीस राजेश सानप यांनी जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी, माजी जि.प. सदस्य नंदकुमार म्हात्रे, माजी सभापती लक्ष्मण महाले, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.