विशेष विद्यार्थ्यांकडून सैनिकांसाठी 1500 राख्या

| खरोशी | वार्ताहर |

आई डे केअर संस्थेतील विशेष विद्यार्थी रक्षाबंधनासाठी राख्या तयार करत आहेत. दररोज संस्थेत सातशे राख्या बनविल्या जातात. आज व्यावसायिक वर्गात 28 विद्यार्थी काम करत असून त्यातील 18 विद्यार्थी हे स्वयंम वर्गात कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे काम करत आहेत, आणि पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत मानधनही घेत आहेत संस्थेतून पंधराशे राख्या सीमेवरील जवानांसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत.

यामध्ये जनशिक्षण संस्थान अलिबाग, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल डॉक्टर समिधा गांधी राजलक्ष्मी सृष्टी नीलिमा गडकरी सृष्टी सावंत पेण मधील सर्व शाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
समाजातील इतर लोकांनीही या विशेष विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विशेष राख्या विकत घेऊन त्यांच्या स्वावलंबनासाठी हातभार लावावा असे आवाहन संस्थापिका स्वाती महेंद्र मोहिते यांनी केले आहे.
मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील, डॉ. शिल्पा ठाकूर, सतीश म्हात्रे, संतोष चव्हाण, विद्या खराडे, प्रतिभा मोकल ज्योत्स्ना वारगुडे आणि दिव्या ठाकूर काळजीवाहक यांनी अतिशय परिश्रम घेतले आहेत.

Exit mobile version