गणेशोत्सवासाठी चिपळूणहुन १६० गाड्या

। चिपळूण । वार्ताहर ।
गणेशोत्सवासाठी चिपळूण आगार सज्ज झाला आहे. मुंबई परिसरात राहणार्‍या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी चिपळूण आगारातून 160 जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय दररोज 80 गाड्या नियमित धावणार आहेत.अशी माहीती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.

गणरायाचे आगमन 31 ऑगस्टला घरोघरी होणार आहे. मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, खार आदी ठिकाणी नोकरीनिमित्त असलेल्या चाकरमान्यांना गावी सुरक्षित पोचता यावे यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशभक्तांना त्यांच्या निश्‍चित स्थळी पोचवण्यासाठी चिपळुणातून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी खास सुट्टी काढून गावी येण्याच्या तयारीत आहेत. गणेशोत्सवात गावी येणार्‍या तसेच परतीच्या मार्गावरील भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटीने व्यवस्था केली आहे.

Exit mobile version