युद्धात 160 मुलींचा बळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, 28 फेब्रुवारीला इराणमधील मिनाब शहरात एका प्राथमिक शाळेवर हल्ला झाला होता. यात 160 मुलींचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा सर्वात भयंकर असा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यावरून आता अमेरिकेवर मलाला यूसुफजईने टीका केली आहे. तर, अमेरिकेकडून आम्ही जाणीवपूर्वक हल्ला केला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. शाळेवर झालेल्या हल्ल्यात 160 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहांचं दफन शाळेच्याच आवारात करण्यात आलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वृत्ताबाबत माहिती दिली आहे.

Exit mobile version