| अलिबाग | वार्ताहर |
जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कुष्ठरोग आरोग्यसेवा सहाय्यक संचालक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्यामार्फत अलिबाग जिल्हा कारागृहात शिबीर शुक्रवारी (दि.6) आयोजित करण्यात आले. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोधमोहीम अभियान 2025-26 अंतर्गत शिबीरात कारागृहातील एकूण 169 बंदीवानांची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रात 2027पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसारध्येय साध्य करण्यासाठी कुष्ठरोगमुक्त सुरक्षा महाराष्ट्र (कुसुम) शोधमोहीम कार्यक्रम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहात शिबीर आयोजित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सकपाळ यांनी बंदीबांधवांना कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कुष्ठरुग्णांचा शोध, निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल 169 बंद्यांची कुष्ठरोगाबाबतची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाकरीता जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सकपाळ, वैद्यकीय सहाय्यक भगवान जाधव, लिपिक तेजस मोरे, निम्न वैद्यकीय कर्मचारी राजकुमार गाजुलवार, सांखिकी सहाय्यक प्रतिक पाटील, आरोग्य सेवक ऋतिक जाधव, आशासेविका सोनाली जाधव, प्रबोधन सामाजिक सेवा संस्था उपाध्यक्ष डॉ.मिलिंद पाटील, तसेच सुभेदार देवलु मुकुंद रांजड, हवालदार सुनिल जाधव, कारागृह शिपाई प्रशांत पाटील, सतिश जुंबळे, नरसु जयंद्रथ कोळी इत्यादी उपस्थित होते.
जिल्हा कारागृहातील बंदीवानांची कुष्ठरोग तपासणी
