रायगड जिल्ह्यात 173 नवे कोरोना रुग्ण

7 जणांचा मृत्यू तर 224 झाले कोरोनामुक्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी नव्याने 173 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 224 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

मंगळवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 50, पनवेल ग्रामीण 21, उरण 11, खालापूर 8, कर्जत 7, पेण 4, अलिबाग 31, मुरुड 2, माणगाव 2, रोहा 3, सुधागड 1, श्रीवर्धन 5, म्हसळा 3, महाड 14, पोलादपूर 11 असे एकूण 173 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तळा तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच पनवेल मनपा क्षेत्रात 3, तर कर्जत, अलिबाग तळा, आणि श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 81, पनवेल ग्रामीण 34, उरण 9, खालापूर 17, कर्जत 9, पेण 7, अलिबाग 35, रोहा 18, सुधागड 4, श्रीवर्धन 2, म्हसळा 1, महाड 7 अशा एकूण 224 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 62 हजार 224 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 56 हजार 011 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 072 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 141 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version