समाजकल्याणचे 175 प्रस्ताव मंजूर

। सिंधुदुर्गनगरी । वृत्तसंस्था ।
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत 20 टक्के सेसअंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या 10 कोटी 9 लाख 75 हजार रुपये खर्चाच्या 175 प्रस्तावांना गुरवारच्या (ता.17) समाज कल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, समिती सदस्य संजय पडते, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, मानसी जाधव आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version