बॅटरीवाल्याला 17,500 कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बॅटरी बनवणार्‍या एका स्टार्टअप कंपनीने या व्यक्तीला वार्षिक 17,500 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. जगदीप सिंग असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सॅलरी पॅकेजमुळे तो जगभरात चर्चेत आला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलोन मस्कशी स्पर्धा करते. जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. याशिवाय त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याला क्वांटमस्केप कॉर्पोरेशनने 2.3 बिलियन डॉलरचे पॅकेज दिले आहे.

Exit mobile version