आर्यनच्या सुटकेसाठी 18 कोटींचे डील

। मुंबई  । वृत्तसंस्था ।

मुंबई क्रूज ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान  याची सुटका करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातील आठ कोटी रुपये हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केला आहे. दरम्यान, हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी याचा आर्यन खानबरोबरील सेल्फी व्हायरल झाला होता. प्रभाकर साईल हा केपी गोस्वामी यांचा बॉडीगार्ड होता. एक प्रतिज्ञापत्र सादर करत त्याने समीर वानखेडे आणि केपी गोसावी या दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत.साईल याने  म्हटलं आहे की, जीवाला धोका होता म्हणून आजपर्यंत याप्रकरणी काहीच बोललो नाही. यावेळी आर्यन खानला एनसीबीने पकडले होते. मी केपी गोसावी यांच्याबरोबरच होतो. या वेळी  मला पंच म्हणून बोलविण्यात आले. मला कोर्‍या कागदावर सही करण्यास सांगितले. कोर्‍या कागदावर सही कशी करणार, अशी विचारणाही मी केली. काहीही होत नाही, असे सांगत समीर वानखेडे यांनी माझी कोर्‍या कागदावर सही घेतली. यानंतर या कागदावर काय लिहिण्यात आले याची मला माहिती नाही, असेही साईल याने म्हटले आहे.

Exit mobile version