| पनवेल | प्रतिनिधी |
18 वर्षीय प्रांजल मच्छिंद्र रायकर (रा. ओम न्यू रेसिडेन्सी, टेंभोडे, पनवेल) ही तरुणी हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तिची उंची पाच फूट, सहा इंच, चेहरा उभट, डोळे काळे आहेत. डोक्याचे केस काळे आणि लांब असून, ती अंगाने सडपातळ आहे. तिचा रंग सावळा असून, पायात काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि अंगात पांढऱ्या रंगाची टी-शर्ट परिधान केले आहे. तिच्या उजव्या हाताच्या दंडावर भावाचा फोटो गोंदलेला आहे. या मुलीबाबत अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवानंद पुजारी यांच्याशी संपर्क साधावा.







