मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले चोरीला; किरीट सोमय्या करणार रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार

। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्र्याच्या बंगल्यांचे नेमके काय झाले याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले होते. मात्र तणाव निर्माण झाल्याने त्यांनी बंगल्यांचा शोध न घेता रेवदंडा पोलीस ठाणे गाठले. सोमय्या पोलीस ठाण्यात पोहोचले असून मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोर्लईच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे बंगले नसल्याचा खुलासा केल्यानंतर हरवलेले बंगले शोधण्यासाठी किरीट सोमय्या शुक्रवारी (दि. 18) कोर्लईत आले. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणताही अपशब्द वापरल्यास खपवून घेणार नसल्याचे रोखठोक सांगितले. तसेच भाजपने संयम बाळगावा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशाराही शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. शिवसेना कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून पळ काढल्याची चर्चा सुरु झाली. समोर आले आहे. किरीट सोमय्या भाजपच्या पनवेल, पेण, अलिबागमधील कार्यकर्त्यांसमवेत कोर्लईत दाखल झाले. भाजपचे झेंडे फडकत असल्याचे पाहून शिवसेना कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला.

Exit mobile version