19 वर्षीय तरुण बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील पडघे गाव येथून एक 19 वर्षीय तरुण कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेल्याने तो हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सिंटु प्रदिप राम असे या तरुणाचे नाव असून तो अंगाने सडपातळ, उंची 5 फुट 7 इंच, रंग सावळा, केस काळे व बारीक, मुछ बारीक व काळी, नाक सरळ, डाव्या कानात पितलळेची बाळी असे या तरुणाचे वर्णन आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे (मो.नं. 9552598977) यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version