। पनवेल । वार्ताहर ।
मित्राबरोबर फेरफटका मारुन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला एक तरुण अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार उलवे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुधीर शशिकांत मिसले (26) रा.उलवे उंची 5 फुट 2 इंच, रंग गोरा, बांधा मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, दाढी मिशी बारीक असून अंगात लाल रंगाचा हाफ बाह्याचा टी-शर्ट व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट तसेच पायात हिरव्या रंगाची चप्पल आहे. त्याला हिंदी व मराठी भाषा अवगत आहे. सोबत मोबाईल फोन आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने उलवे पोलीस ठाणे किंवा पो.हवा.धनाजी डांगे यांच्याशी संपर्क साधावा.







