जिल्ह्यात 13 तालुक्यात 190 कोरोना रूग्ण

126 कोरोना मुक्त; 704 अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

बुधवारी रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये तब्बल 190 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 126 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 97, पनवेल ग्रामीण 31, उरण 4, खालापूर 2, कर्जत 11, पेण 7, अलिबाग 14, मुरुड 3, माणगाव 2, रोहा 6, सुधागड 1, श्रीवर्धन 8, म्हसळा 2 आणि महाड 2 असे 190 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 79, पनवेल ग्रामीण 23, खालापूर 4, कर्जत 1, पेण 7, अलिबाग 6, मुरुड 1, रोहा 1, श्रीवर्धन 4 अशा एकूण 126 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 798 झाली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 394 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 700 इतका आहे. सद्यस्थितीत 704 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version