| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एक ग्रामपंचायतींमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी 40 तर 67 सदस्य पदासाठी तब्बल 229 अर्ज दाखल झाले होते. 23 ऑक्टोबर रोजीच्या छाननीत सरपंच पदातील 2 अर्ज अवैध, तर सदस्यांमधील 6 अर्ज अवैध ठरले आहेत.
तालुक्यातील नसरापूर, वदप, गौरकामत, ओलमण, अंभेरपाडा, खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि सदस्य पदाची निवडणुक आहे. सरपंचपदाच्या अर्जातील वदप -1, ओलमण-1 ग्रामपंचायतीमधील एक एक असे 2 अर्ज अवैध ठरले, तर सदस्यामधील वदप -1, ओलमण-1, खांडस -3, नांदगाव -1 ग्रामपंचायतीमधील 6 अर्ज अवैध ठरले आहेत. आता सरपंच पदासाठी 38 तर सदस्यासाठी 223 अर्ज राहिले आहेत.