मुरुड एसटी आगारात 2 सीएनजी बसेस दाखल

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड एसटी आगारात एम. एस. बाॅडीच्या 2 सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता एसटी प्रवास डिझेल ऐवजी सीएनजी प्रवास होणार असल्याने एसटी डेपो प्रदुषणमुक्त होणार आहे.

मुरुड एसटी आगारात एम. एस. बाॅडीच्या २ सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत. या सीएनजी बसची 10 टनाची क्षमता असून या बसच्या खाली 2 सीएनजी सिलेंडर बसविण्यात आले आहेत. यामध्ये 100 किलो सीएनजी गॅस भरता येणार असून याचा प्रवास 400 किमीपर्यंत होणार आहे. यामुळे एसटी महामंडळाचे रोज शेकडो लिटरचे डिझेल वाचणार आहे. तसेच, डिझेल ऐवजी सीएनजी प्रवास होणार असल्याने एसटी डेपो प्रदुषणमुक्त होणार आहे.

मुरूड डेपोत 2 सीएनजी बसेस दाखल झाल्या असून या बसेस मुरुड-बोरीवली व मुंबई मार्गावर सुरू केल्या आहेत. आपल्याकडे सीएनजी गॅसची सेवा नसल्याने येताना चालक पेण आगारातुन सीएनजी गॅस भरून पुन्हा मुरुडकडे येत असतात. या सीएनजीमुळे डेपोला फायदा होणार आहे. यामुळे अजून 10 सीएनजीच्या बसेसची मागणी पेण विभागीय वाहतूक (डीव्हीजन) कडे केली आहे. यामुळे हा डेपो प्रदुषणमुक्त होणास वेळ लागणार नाही.

– मुरूड आगार व्यवस्थापक, राहुल शिंदे

Exit mobile version