माळी भेरसे येथे 2 लाखांची घरफोडी

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत माळी भेरसे येथे राहणार्‍या रोशन सदानंद म्हात्रे यांच्या घरात चोरी होऊन दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला. म्हात्रे यांच्या लोखंडी कपाटात ठेवलेले 1 लाख 93 हजार रूपये किमंतीचे सोन्याचांदिचे दागिनेसह रोख चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पो.ह. दिनेश रामनाथ पिंपळे हे करत आहेत.

दरम्यान,दुसर्‍या घटनेत कोर्लई व वांदेली येथून तांब्याच्या कॉईल्स व अ‍ॅल्युमिनियच्या ताराची चोरी झाली आहे. कोर्लई येथील गाळा कंपनीचे कम्पाउंड मधून व वांदेली येथून म.रा.वि.मंडळाचा ताबे कब्जातील एकूण 2 लाख 20 हजार रूपये किमंतीची तांब्याची कॉईल्स व अ‍ॅल्यमिनियमच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरीस नेल्याची तक्रार म.रा.वि.मंडळाच्या अधिकारी मनोज सुरेश चव्हाण यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविली आहे.

Exit mobile version