| रेवदंडा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनी कामगारासाठी वसलेल्या वसाहतीत गेले वर्षभर अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी पाच घरे फोडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याची दागिने असा ऐवज लंपास केला. यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. तर पंचक्रोशीत भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे रेसिडिशियल कॉलनी बिर्ला येथील डी-5 मधील रूम नंबर 64 चे रहिवासी त्रेपन्न वर्षीय राजेंद्र वासुदेव रोटकर यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते राहात असलेला खोलीचा लॅच लॉक तोडून बेडरूममधील ठेवलेल्या रूपये 90 हजार किमतीचे प्रत्येकी एक तोळाप्रमाणे 3 तोळ्याचे तीन सोन्याचे धातूचे हार, 75 हजार किमतीचे दोन सोन्याच्या बांगड्या वजन अंदाजे सव्वा तोळे, 30 हजार रूपये किमतीचे दोन सोन्याच्या कानातील कुड्या वजन अंदाजे प्रत्येक अर्धा तोळा, 12 हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या धातूच्या लहान मुलींच्या कानातील कुड्या अंदाजे 0.5 ग्रॅम, दोन लाख रूपये, 500 रूपये दराच्या भारतीय चलनातील 400 नोटा, असे एकूण 5 लाख 28 हजार 500 रूपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी व लबाडीचे हेतूने लंपास केला.
याबाबत रेवदंडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक राजकुमार नंदगावे हे करत आहेत.