शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2 हजार होणार जमा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील, तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात येणार आहेत. त्यामुळे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्यातील 2,000 ट्रान्सफर होतील. मागील वर्षी 25 डिसेंबरला केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.

‘या’ शेतकर्‍यांना 4 हजार रुपये मिळणार
ज्या शेतकर्‍यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. मात्र, ही सुविधा फक्त त्या शेतकर्‍यांसाठी उपलब्ध असेल, ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.

Exit mobile version