। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 पासून सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 20.40 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात 19.45 टक्के मतदान, पनवेलमध्ये 16.89 टक्के मतदान, पेणमध्ये 18.9 टक्के मतदान, कर्जतमध्ये 20.1 टक्के मतदान, श्रीवर्धनमध्ये 18.22 टक्के मतदान, उरणमध्ये 29.26 टक्के मतदान, महाडमध्ये 22.67 टक्के मतदान झाले आहे. चार तासांच्या कालावधीत उरण मतदार संघात अधिक तर, पनवेल मतदार संघात कमी मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.