। पनवेल । वार्ताहर ।
एक 20 वर्षीय तरुणी कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोहिणी रामसुख यादव (20), रंग सावळा, केस काळे व लांब, नाक सरळ, चेहरा उभट, उंची 5 फूट 2 इंच असून, अंगात लाल रंगाचा कुर्ता व त्यावर पिवळ्या रंगाची लेगीज, पायात राखाडी रंगाची चप्पल असून, तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. ती कळंबोली डी मार्ट परिसरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक एस.व्ही. मासुळ, मो.नं.8108992290 येथे संपर्क साधावा.