पोलीस अधिक्षकांची अनोखी गीफ्ट
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महिला दिनाच्या दिवशी महिला पोलिसांना सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी बंदोबस्तासाठी पोलिस मुख्यालयात बोलाविले आणि पावनखिंड चित्रपट पाहण्यासाठी नेऊन पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सुखद धक्का दिला आहे. पोलिस मुख्यालय येथे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड पोलिस दलातील सर्व शाखेच्या महिला अधिकारी, कर्मचारी, निर्भया पथकाचे महिला अधिकारी, कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील सर्व महिला कर्मचारी व पोलिस अधीक्षक कार्यालय येथील महिला कर्मचारी व क्लार्क यांना मंगळवारी 3 वाजता बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. सर्वजण एकत्र आल्यानंतर अचानक ब्रह्मा, विष्णू महेश चित्रपटगृहात नेऊन त्यांना पावनखिंड हा चित्रपट दाखविण्यात आला. पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना खूपच आनंद झाला.
200 महिला पोलिसांना आज बंदोबस्तासाठी जात आहोत असे सांगून अलिबाग पोलिस मुख्यालयात बोलविण्यात आले. त्यांच्यावरील कामाचा ताण घालविण्यासाठी ऐतिहासिकतेवर अधारीत असलेला पावनखिंड हा चित्रपट दाखविण्यात आला. यातून त्यांच्या मनात असलेला कामाचा ताण काही प्रमाणात कमी होईल हि मानसिकता होती. चित्रपटगृहात आल्यानंतर या महीला पोलिसांना एक वेगळाच आनंद मिळाला असल्याचे त्यांच्या चेहर्यावरून दिसून आले.
अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक
पोलिस ठाण्यात दररोजचे काम करीत आम्ही सर्व बसलो होतो. अचनाक पोलिस ठाण्याचा फोन खणानला आणि मुख्यालयात बंदोबस्तासाठी हजर रहा असे सांगण्यात आले, तात्काळ आम्ही मुख्यालय गाठले. थोड्याच वेळात पाहतो तर काय आम्हाला सरप्राईज म्हणून चित्रपट गृहात पाठवल. त्यामुळे आनंद मिळाला.
संक्राती पाटील, महिला पोलिस नाईक