जिल्ह्यात २०३ कोरोना रूग्ण १४८ कोरोना मुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये २०३ रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात १४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शुक्रवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात १००, पनवेल ग्रामीण ३६, उरण ९, खालापूर ५, कर्जत ३, पेण १०, अलिबाग १७, मुरुड १, माणगाव ६, रोहा ४, श्रीवर्धन ४, म्हसळा ३, महाड ४ तर पोलादपूर १ असे २०३ रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील ४०, पनवेल ग्रामीण ४१, उरण २, खालापूर १३, कर्जत १२, पेण १३, अलिबाग १३, माणगाव ३, तळा १, रोहा ५, सुधागड २, श्रीवर्धन २, आणि महाड १ अशा एकूण १४८ रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख २० हजार १७४ झाली आहे. यापैकी २ लाख १४ हजार १५३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा ४ हजार ७०१ झाला आहे. सद्यस्थितीत 1 हजार ३१९ सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version