178 कोरोना मुक्त; 1 हजार 081 अॅक्टीव्ह रुग्ण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मंगळवारी रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये तब्बल 219 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 081 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान अलिबाग येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 219 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 111, पनवेल ग्रामीण 33, उरण 11, खालापूर 5, कर्जत 8, पेण 20, अलिबाग 18, मुरुड 5, माणगाव 3, रोहा 2, श्रीवर्धन 1, पोलादपूर 1 आणि महाड 1 असे 219 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 96, पनवेल ग्रामीण 31, उरण 5, खालापूर 2, कर्जत 11, पेण 7, अलिबाग 7, माणगाव 8, तळा 1, रोहा 5, सुधागड 3, महाड 2 अशा एकूण 178 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 821 झाली आहे. यापैकी 2 लाख 12 हजार 039 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 701 इतका आहे. सद्यस्थितीत 1 हजार 081 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.






