रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा श्रावण सोसायटी येथील हेमंत विठ्ठल पालव (52) यांना मॅरिअम ब्रिजेड हिने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर फेसबूक व तिचे व्हॉट्सअप नंबर +447418341906 द्वारे हेमंतसोबत मेसेज करुन त्याला विश्वासात घेतले. यावेळी हेमंत व मॅरिअम ब्रिजेड या दोघांत फेसबुकवरुन मैत्री झाली. यानंतर मॅरिअम ब्रिजेड हिने हेमंतला यूके येथून पार्सल कुरिअरद्वारे पाठवून त्यामध्ये 50 हजार पाऊंडची रक्कम व गिफ्ट असल्याचे आमिष दाखवून हेमंत पालव यांना रॉयल बॅक ऑफ स्कॉटलँडचे अधिकारी असल्याचे नाव सांगून मोबाईलधारक दिल्ली येथील कस्टम अधिकारी सुनिता हिने तिचे मोबाईलवरुन कोरोनाग्रस्तांकरिता मदत पाठवितो, असे सांगितले. यात हेमंत यांनी टप्प्या-टप्प्याने ऑनलाईन रक्कम पाठवून एकूण 21 लाख 85 हजार 200 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात मॅरिअम ब्रिजेड व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे करीत आहेत.